मुंबई | राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
जातीविरहीत राजकारण हा शिवसेनेचा गाभा आहे. दिलेला शब्द पाळणे हे शिवसेनेची निती मी पाहिली आहे आणि याच कारणास्तव मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं क्षीरसागरांनी म्हटलं आहे.
मी कुठल्याही अटींवर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत काम करणार आहे, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, आज संध्याकाळी शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
–विरोधकांच्या रक्तपाताच्या धमकीला पासवानांचे जशास तसं उत्तर, म्हणाले…
-आझम खान यांचा ईव्हीएमवर निशाणा; म्हणाले 3 लाख मतांनी नाही जिंकलो तर…
-सर्वोच्च न्यायालयही भाजपसोबत सामील आहे का?; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
-लोकसभा निकाल लागायला अवघे काही तास; राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना महत्वाचा संदेश
-शरद पवार जर येथून निवडणूक लढले असते तर मी त्यांच्या प्रचाराला गेलो असतो- प्रकाश आंबेडकर
Comments are closed.