बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला; अजित पवारांनी सांगितलं कारण

मुंबई |  जयदत्त क्षीरसागर यांनी घरगुती वादातून राष्ट्रवादी सोडली आहे. राष्ट्रवादी विधानसभेचं तिकीट  पुतण्या संदीपला देईल, मला देणार नाही, असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, असं  क्षीरसागरांच्या शिवसेना प्रवेशाचं कारण अजित पवारांनी सांगितलं.

बीडची जागा शिवसेनेकडे जाईल म्हणूनही ते शिवसेनेत गेले असावेत. वास्तविक एक आमदार गेल्याने पक्षाचं नुकसान होतं पण आम्ही ते नुकसान भरून काढू, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीने त्यांना बीड लोकसभा लढवायची ऑफर दिली होती पण त्यांनी ती नाकारली, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आज संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत क्षीरसागरांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महत्वाच्या बातम्या

-निकालाच्या एक दिवस आधी अमित शहांनी विरोधकांना विचारले हे 6 प्रश्न!

-उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमारने लिहिली फेसबुक पोस्ट

-वैर विसरून आम्ही पुढे आलो आहोत; भुजबळांची राज ठाकरेंवर स्तुतीसुमने

-क्षीरसागरांनी पक्ष सोडल्याने मला दुख: होत आहे- छगन भुजबळ

-मी इंजिनिअर, त्यामुळे मला माहितेय ईव्हीएम हॅकिंग होऊ शकत नाही- पृथ्वीराज चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More