बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं’; हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरात कबुली

कोल्हापूर | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मुक आंंदोलनाला कोल्हापूरातुन सुरूवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. आजच्या या आंदोलनात अनेक लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. विरोधी पक्षातून चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनात हजेरी लावली होती. तर ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आंदोलनात सहभागी झाले होते. हसन मुश्रीफांनी या आंदोलनात ठाकरे सरकारकडून झालेल्या चुकीची कबुली दिली आहे.

सर्वात आधी मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडी सरकारने दिलं. त्यावेळी नारायण राणे समिती नेमून मराठा आरक्षण देण्यात आलं. पण त्यावेळी आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती, त्यामुळेच हायकोर्टाने आरक्षण नाकारलं, अशी कबुली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

भाजपला हात जोडून विनंती, राजकारण करु नका, मराठा आरक्षण टिकलं नाही म्हणता, पण कायदा नीट केला असता तर टिकला असता, त्यामुळे आता एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता, मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करु, असं आवाहनही हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. सर्व विषय पूर्ण केल्याशिवाय शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, ही ग्वाही मी देतो. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, हे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं मुश्रीफांनी कोल्हापूरात सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्यांच्याकडे चावी असते ते कुणालाही टाळं लावू शकतात; मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू”

“लोक सरपंचपद वाटून घेतात, तसे महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं”

“अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार”

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा – प्रकाश आंबेडकर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More