बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणजे निश्चितच काहीतरी काळंबेर आहे’; नवाब मलिक आक्रमक

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीकडून अटक झाल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा वाद  दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांनी अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहेत. त्यातच पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं आहे.

समीर वानखेडे कालपर्यंत माझ्या  जीवाला धोका आहे, असं म्हणत मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागत होते. तेच वानखेडे आज मुंबई हायकोर्टात धाव घेत आहेत आणि मुंबई  पोलिसांबद्दल अविश्वास दाखवतात, याचाच अर्थ याच्यात निश्चितच काहीतरी काळंबेरं आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

माझ्यावरील आरोपांचा तपास एनसीबी करत आहे तर मुंबई पोलिसांनी वेगळा तपास करण्याची काय गरज आहे? असा सवाल समीर यांनी याचिकेत उपस्थित केला होता. तसेच चौकशी करताना काही वाटल्यास सीबीआय किंवा एएनआय मार्फत चौकशीस करा, असंही समीर वानखेडे म्हणाले होते.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या 25 कोटी डिल आरोपावरून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याकरिता विशेष पथकाची नेमणूक केली आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून समीर वानखेडे यांना अटक करण्याची गरज असल्यास 72 तास अगोदर नोटीस द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिेले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

ठाकरे सरकारने अंगणवाडी सेविकांना दिलं ‘हे’ भाऊबीजेचं खास गिफ्ट

“मी वानखेडे कुटुंबीयांची माफी मागतो, ठाकरे सरकारच्या…”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

भारताने परदेशी बॅंकांकडे मागितली 15 हजार कोटींची मदत; काॅंग्रेस आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More