बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यातील चार टोळींमधील 18 गुंडांना केलं तडीपार

सातारा | सध्या राज्यात पोलीस खात्याने गुंडांचा नायनाट करण्यासाठी कडक पाऊलं उचलल्याचं दिसत आहे. अशातच सातारा पोलिसांनीही जिल्ह्यातील 18 गुंडांना तडीपार करण्याचा निर्णय घेतला आहे. खून, दरोडे, लुटमार आणि घरफोड्यांचे गुन्हे असणाऱ्यांविरोधात सातारा जिल्ह्यातील चार टोळ्यांमधील 18 गुंडांना  दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे.

यामध्ये सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर गुन्हे असणाऱ्यांमध्ये अमीर इम्तियाज मुजावर रा. पिरवाडी सातारा, अमीर सलीम शेख रा. वनवासवाडी सातारा, अभिजित राजू भिसे रा. आदर्शनगरी सैदापूर, जगदीश रामेश्‍वर मते रा. रांगोळे कॉलनी शाहूपुरी, आकाश हणमंत पवार, सौरभ  संजय जाधव रा. सैदापूर, सातारा तर त्यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सागर नागराज गोसावी, अर्जुन नागराज गोसावी, रवी नीळकंठ घाडगे रा. यशवंतनगर सैदापूर, विपुल तानाजी नलवडे रा. वायदंडे कॉलनी सैदापूर आणि अक्षय रंगनाथ लोखंडे रा. सैदापूर यांचा समावेश आहे.

वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रॉकी निवास घाडगे, कृष्णा निवास घाडगे, सनी निवास घाडगे रा. लाखानगर सोनगीरवाडी, वाई तर कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशिष अशोक पाडळकर, इंद्रजित हणमंत पवार, अनिकेत रमेश शेलार रा. मलकापूर कराड) आणि सुदर्शन हणमंत चोरगे रा. कोयना वसाहत कराड यांचा समावेश असून या गुंडांना तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक हद्दपार प्राधिकरण अजयकुमार बन्सल यांनी हा निर्णय घेतला आहे. तडीपारीच्या काळात या गुंडांपैकी एखादा गुंड जिल्ह्यात दिसला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश बन्सल पोलीस ठाण्यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

मनसुख हिरेनचं नक्की काय झालं? संपूर्ण घटनाक्रम; वाचा सविस्तर…

बाबो! रिषभ पंतने जेम्स अँडरसनला मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का, पाहा व्हिडीओ

44 किलो गांजा जप्त, आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार

कौतुकास्पद! रूग्णांना त्वरित रक्त मिळण्यासाठी अभिनेता सोनू सूदनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More