बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यांमध्ये आहेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली | देशात लसीकरण मोहीम वेगाने होत असूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण वाढण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रात आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दिल्ली आणि बंगळुरू अर्बनमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बंगळुरू अर्बन या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशात गेल्या 24 तासात 56 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 271 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचा फैलाव आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकारने कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. देशात आतापर्यंत 1 लाख 62 हजार 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 54 हजार 283, तमिळनाडूमध्ये 12 हजार 684, कर्नाटकात 12 हजार 520, दिल्लीत 11 हजार 12, पश्चिम बंगालमध्ये 10 हजार 325, उत्तर प्रदेशात 8 हजार 790, आंध्र प्रदेशमध्ये 7 हजार 210 आणि पंजाबमध्ये 6 हजार 749 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोना पसरण्याचा वेग कमी करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. लॉकडाऊन शिथिलीकरणावेळी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तोंडाला मास्क, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणं या बाबी कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी आपला नंबर येईपर्यंत या सवयींमुळे आपण कोरोनाला रोखू शकतो.

थोडक्यात बातम्या – 

लठ्ठ व्यक्तींना आधी कोरोनाची लस द्यावी की नाही?, जगात सुरु आहे नवा वाद

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनात एकनाथ शिंदेंना डावललं; भाजप नेत्याचं प्रश्नचिन्ह!

शरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे पिता-पूत्रांनी गाठलं ब्रीच कँडी रुग्णालय

मित्राच्या गर्लफ्रेंडला घरी बोलावून दारु पाजली, त्यानंतर केला बलात्कार!

शस्त्रक्रियेनंतर शरद पवार ठणठणीत, फोटो ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More