पोस्टाची भन्नाट योजना; पैसे होतील डबल

नवी दिल्ली | गुंतवणूक (investment) असणं सध्या काळाची गरज आहे. अशावेळी अनेक लोक पोस्टामध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग निवडतात. कारण तो विश्वासू आणि फादद्याचा पर्याय आहे. तसेच पोस्ट ऑफीसमध्ये अनेक वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत.

पोस्टात एक अशी योजना आहे जी तुमचे पैसे डबल करु शकते. त्या योजनाचे नाव आहे किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Yojana). ही योजना पूर्वी फक्त शेतकऱ्यासांठी (For the farmer) मर्यादित होती. मात्र याचा फायदा आता सामान्य नागरिकसुद्धा घेऊ शकतात.

पैसे दुप्पट करण्यासाठी लोक या किसान विकास पत्र योजनेचा वापर करतात. ही योजना अतिशय लोकप्रिय आहे. अलीकडे सरकारने पैसा दुप्पट करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. या योजनेत पूर्वी 6.9 टक्के व्याजदर (Interest rate) मिळत होता जो आता 7 टक्के करण्यात आला आहे.

या योजनेमध्ये 123 महिने अर्थात 10 वर्षे तीन महिन्यात पैसे डबल होतात. यापूर्वी ही मुदत 124 महिने होती जी ऑक्टोबरमध्ये (October) बदलण्यात आली आहे. 1000 रूपये इतक्या कमी किमती देखील तुम्ही खाते उघडू शकता. वयाच्या 18 व्या वयानंतर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता.

अगदी लहानपणी देखील तुम्ही गुंतवणुक करु शकता. अल्पवयीन व्यक्तीचं वय 10 वर्ष पूर्ण होताच त्याच्या नावावर ट्रान्सफर करु शकता. तसेच तुमचं वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे तीन लोक किसान पत्र योजनेत एकत्र नोंदणी करु शकता.

तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी जरी गुंतवणूक केली तरी वयाच्या तीस वर्षापर्यंत तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुमचे पैसे डबल होऊ शकतात. या योजनेत तुम्ही गुतवणुंक करायला हरकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More