‘या’ कारणांमुळे 27 वर्षांनंतर देखील काँग्रेस भाजपला हरवू शकला नाही!

नवी दिल्ली | अखेर गुजरातमध्ये (Gujarat) पुन्हा एकदा भाजपने (BJP) झेंडा रोवला आहे. काँग्रेस (Congress) आणि आप (AAP) पक्षाला मात्र पराभव स्विकारावा लागला आहे. गेली 27 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. यावर्षीही हा विक्रम कायम राखण्यास भाजपला यश आलं आहे.

गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला गेल्यानं हा निकाल अपेक्षित होता. मात्र काँग्रेसचा दारूण पराभव झााला आहे. हार पत्करावी लागली, आप पक्षाला मात्र गुजरातमध्ये बऱ्यापैकी जागा मिळाल्याचं पहायला मिळालं. आप पक्षाची राष्ट्रीय पक्ष (National Party) म्हणून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एक गोष्ट या निवडणुकीत (Election) झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी काँग्रेस पक्षाला आतापर्यंत अत्यंत कमी अर्थात 18 टक्के जागा मिळाल्या आहेत. हा टक्का 2017 मध्ये 41 टक्के होता. यावेळी तो अचानक निम्मा झाल्याचं पहायला मिळालं आहे.

27 वर्षानंतर देखील काँग्रेसला भाजपला (BJP) का? हरवू शकत नाही. तसेच यावेळी काँग्रेसला इतक्या कमी जागा मिळण्याचं नेमकं कारण काय आहे. याची अनेक कारण सांगितली जात आहे.

गुजरातमध्ये म्हणावा असा काँग्रेसचा कोणाताही नेता किंवा चेहरा नव्हता. काँग्रेसकडे स्टार कॅम्पेनरही नव्हता. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या काही मोजक्याच सभा गुजरात मध्ये झाल्याचं पहायला मिळालं. प्रियंका गांधीच्या(Priyanka Gandhi) ही सभा झाल्या नाहीत. तर सोनिया गांधी (Sonia Gandhi) आजारपणामुळे सभा घेऊ शकल्या नाहीत. गेल्या पाच वर्षात एकूण 19 काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

महत्त्वाचे असे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि चाणक्य समजले जाणारे नेते अहमद पटेल (Ahmed Patel) याचं निधन झालं. त्यामुळे याचा फटका काँग्रेसला बसला. यामुळे काँग्रेसची टक्केवारी यावेळी घसरली असल्याचं पहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More