नुसता धूर! नवीन वर्षात बघायला मिळणार राॅयल इनफिल्डच्या ‘या’ गाड्याचा थरार

नवी दिल्ली | राॅयल इनफिल्ड (Royal Enfield) ही तशी तरुणाईच्या पसंतीची गाडी आहे. अनेकदा तिला तरुणांची क्रश म्हणून देखील ओळखलं जातं. नवीन वर्षाच्या निमित्ताने जर तुम्ही बाईक घ्यायचा विचार करत असाल तर राॅयल इनफिल्ड एक चांगला पर्याय असू शकतो. 2023 मध्ये राॅयल इनफिल्ड च्या काही गाड्या बाजारात येणार आहेत.

पहिला पर्याय आहे Royal Enfield Super Meteor 650. या बाईकचं उद्घाटन 2022 ला झालं आहे. आता 2023 च्या जानेवारी महिन्यात याची किंमत जाहीर केली जाणार आहे. या बाईकमध्ये 650cc पॅरलल ट्विन एअर देण्यात आले आहे. याचं इंजिन 47 bhp ची पाॅवर आणि 52 Nm चा पीक जनरेट करु शकतं.

New Generation Bullet येत्या एप्रिल (April) 2023 ला लाॅन्च होण्याची शक्यता आहे. ही बाईक राॅयल इनफिल्ड बुलेट 350 RE J च्या सिरीजवर अवलंबून असेल. या बाईक मध्ये ऑइल कूल्ड इंजिन मिळणार आहे. 349cc चा सिंगल सिलेंडर देखील मिळेल. लाॅन्च झाल्यानंतर ही भारतातील सगळ्यात स्वस्त गाडी असणार आहे.

ऑगस्ट 2023 मध्ये हिमालयन 450 (Himalayan 450) लाॅन्च होण्याची शक्यता आहे. ही जगातील लोकप्रिय ADV असणार आहे. ही गाडी आकर्षक आणि शक्तिशाली असणार आहे. समोर आलेल्या फोटोनुसार याला USD फ्रंट फोर्क्स, 21 इंच आणि 18 इंच वायर स्पोक व्हील (Spoke wheel)आणि 40 Bhp चे पाॅवर आउटपुट मिळणार आहे.

काॅन्टिनेंटल जीटी (Continental GT) 650 नोव्हेंबर 2023 मध्ये बाजारात येणार आहे. ही काॅन्टिनेंटल जीटी 650 अपडेटेड आवृत्ती असणार आहे. या अपडेटेड बाईकमध्ये अद्यावात सुविधा, नवीन वैशिष्ट्ये आणि अलाॅय/ स्पोक व्हिलचा पर्याय मिळू शकतो.

राॅयल इनफिल्ड शाॅटगन (Shotgun) 650 देखील पुढील वर्षी लाॅन्च होऊ शकते. सध्या या बाईकची भारतात चाचणी सुरु आहे. या राॅयल शाॅटगन 650 ला सुपर मेटिअर 650 प्रमाणे लाॅन्च करण्यात येणार आहे. ही भारतातील सर्वात महागडी बाईक असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या