राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत- नारायण राणे
मुंबई | मागच्या वेळी सिंधुदुर्गाला 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सिंधुदुर्गाला 50 लाख रुपयेच मिळाले. आता पुन्हा मुख्यमंत्री कोकणात आले. लोकांनाही भेटले नाही. काही तासांत मातोश्रीवर आले. नुसता पिकनिक दौरा होता, अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. दोन दिवसात कोकणवासीयांना मदत जाहीर करू असं म्हणाले. अजून मदत जाहीर केली नाही. कोकणाला 200 कोटींचं पॅकेज जाहीर झालं पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली.
या सरकारच्या तिजोरीत देण्यासारखं काही नाही. कोरोनामुळे 80 हजाराच्यावर लोकं मरण पावली आहेत. यांच्याकडे लसही नाही. ऑक्सिजन नाही आणि व्हेंटिलेटरही नाही. हे लोक टेंडरसाठी पैसे खातात. यांची मला ए टू झेड माहिती आहे. कोरोनाच्या औषधासाठी काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
मुख्यमंत्री चिवला बीचवर आले होते. तिथे माझं घर आहे. राणेंचं घर कसं दिसतं हे बघायला आले असतील. ते चिवला बीचवर येणार आहेत हे माहीत असतं तर मी थांबलो असतो. त्यांना घरी बोलावून नारळपाणी दिलं असतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
थोडक्यात बातम्या-
तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने एकाची हत्या; अहमदनगरमधील धक्कादायक घटना
कडक सॅल्यूट! पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट
केंद्र सरकारकडून दिलेल्या वेळेची मर्यादा आज संपुष्टात; ‘या’ समाज माध्यमांवर कारवाई होणार?
‘यास’ चक्रिवादळाचा ट्रेलर, ताशी 150 कि.मी वेगानं धडकण्याची शक्यता ; पाहा व्हिडीओ
कोरोनाची लस जगात सर्वात आधी घेणाऱ्या ‘विल्यम शेक्सपिअर’चा मृत्यू
Comments are closed.