बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! तालिबान्यांच्या भीतीने देश सोडून गेलेल्या नागरिकांना ‘या’ शेजारी राष्ट्राने हाकललं

काबूल | अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य माघारी फिरल्यानंतर तालिबानने देशावर ताबा मिळवला. त्यानंतर अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी नागरिक धडपड करीत आहेत. देशातील लहान मुलांसह महिलांनाही आता मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच अफगाण नागरिक जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या देशात गेले असता त्यांना तेथून माघारी पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर हजारो नागरिक देश सोडून जात आहे. काही नागरिक अजूनही त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. तर काही नागरिकांनी पाकिस्तानच्या सीमेकडे धाव घेतली आहे. ‘डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार कित्येक नागरिक ‘चमन’ परिसरात थांबले होते, तर काहींनी त्या ठिकाणांच्या रेल्वे स्थानकांचा आसरा घेतला होता. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी क्वेट्टापर्यंत मजल मारली होती. परंतु तब्बल 200 नागरिकांना पाकिस्तानच्या पोलिसांनी माघारी पाठवलं आहे. त्यामुळे ते नागरिक आता परत अफगाणिस्तानच्या दिशेने येत आहेत.

अफगाणिस्तानमधून मोठ्या संख्येने अफगाण नागरिक पाकिस्तानात दाखल झाले आहेत. परंतु ज्यांच्याकडे व्हिसा, पासपोर्ट आहेत त्यांनाच पाकिस्तानात प्रवेश दिला जात आहे. त्याच बरोबर जे नागरिक बेकायदेशीरपणे पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत त्या नागरिकांना परत पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, तालिबानची राजवट आल्यानंतर काबूल विमानतळावर लोकांची प्रचंड गर्दी झाली आहेत. अफगाणिस्तानमधून अनेक नागरिक देश सोडून गेले आहेत. तर अजूनही काही नागरिक त्या ठिकाणी अडकले आहेत. अफगाणिस्तानमधून सुटका करून घेण्यासाठी अफगाण नागरिक देशांच्या सीमा भागाकडे जाताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

इंडोनेशियाच्या तुरूंगात अग्नितांडव; 41 कैद्यांचा होरपळून मृत्यू

70 वर्षाच्या आजीबाई चालवतात पंक्चरचं दुकान, पाहा व्हिडीओ

‘…तरच तुमचा भगवा खरा’; संजय राऊतांनी भाजपला दिलं आव्हान

“महाराष्ट्र भाजपने गप्पा न मारता बेळगाव महाराष्ट्राचंच आहे की नाही एवढंच सांगावं”

दैव बलवत्तर! दरड कोसळली पण…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More