बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ देशांनी डेल्टा व्हेरियंटपासून सावध रहावं; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

नवी दिल्ली | गेल्या एका महिन्यात डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अल्फा व्हेरियंटपेक्षा डेल्टा व्हेरियंट 50 पट जास्त संसर्गजन्य आहे, अशी माहिती आरोग्य संघटनेनं दिली होती. विविध देशांमध्ये कोरोना संदर्भातील निर्बंध उठवण्यात घाई करण्यात आली तर त्याचे गंभीर परिणाम होतील. ज्यांचं लसीकरण झालेलं नाही त्यांच्यावर यामुळे अनर्थ ओढवेल, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस घेब्रेसेस यांनी दिला आहे.

आपण सध्या साथीच्या आजाराची महामारी अनुभवत आहोत. जगातील अनेक देश अद्यापही खूपच धोकादायक परिस्थितीतून जात आहेत. तर ज्या देशांमध्ये सर्वाधिक लसीकरण झालेलं आहे. ते देश आता निर्बंध हटवण्याबाबत बोलत आहेत. पण अशा देशांना या डेल्टा व्हेरियंटपासून सावध रहावं लागेल, असं टेड्रोस घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे.

भारतात विषाणूची दुसरी लाट जास्त वेगाने पसरण्यामागे डेल्टा वेरियंटची महत्त्वाची भूमिका होती. डेल्टा वेरियंट अल्फापेक्षा 50 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे विषाणू संक्रमण वेगाने होतं. हे विषाणू स्वरुप तीन म्यूटेंट वेरिएंट आहे. कारण या स्वरुपातून विषाणू तीन लिनिएजमध्ये पसरला जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार सांगितलं होतं.

दरम्यान, भारतात कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट सापडले आहेत. भारतात सापडलेल्या कोरोना व्हेरिएंट बी.1.617.1 आणि बी.1.617.2 याला WHO ने क्रमशः ‘कप्पा’ आणि ‘डेल्टा’ ही नावे दिली आहेत. डेल्टा या स्ट्रेनच्या एक विषाणूचं स्वरूप दुसऱ्या स्ट्रेनपेक्षा घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

मित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला

राज्य शासनाच्या जाचक अटीमुळे 2 महिन्यांपासून 1500 रुपये मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More