‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत फारच स्वस्त, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल खुश

मुंबई | सध्या पेट्रोल-डिझेलच्या(Petrol-Diesel) दरानं उच्चांक गाठला आहे. त्यामुळं अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना(Electric Vehicles) पसंती देत आहेत. गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांचे वेगवेगळे माॅडेल बाजारात आणत आहेत.

परंतु सध्या काही इलेक्ट्रिक गाड्या महाग आहेत. त्यातच जर तुम्ही स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर(Affordable Electric Scooter) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे.

‘एव्हाॅन ई स्कूटर’ ही उत्तम फीचर्स असेलीली इलेक्ट्रिक स्कूटर(Electric Scooter) आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही गाडी 65 किमी पर्यंतची रेंज देते. तसेच गाडीची बॅटरी फुल होण्यासाठी 6 ते 8 तासांचा वेळ लागू शकतो. या गाडीची किंमत 45 हजार रूपये आहे.

‘हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा CX’ ही सुद्धा एक जास्त रेंज देणारी स्कूटर आहे. ही गाडी 82 किमी पर्यंतची रेंज देते. या गाडीमध्ये तीन रंग उपलब्ध आहेत. या गाडीची बॅटरी फुल चार्ज होण्यास 4 ते 5 तास लागू शकतात. या गाडीची किंमत सिंगल बॅटरीसह किंमत 62,190 रूपये आहे.

‘बाउंस अनंत E1’ ही जबरदस्त फीचर्स असलेली आणि खिशाला परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. बॅटरीशिवाय या गाडीची किंमत 45,099 रूपये आहे. ही गाडी 85 किमी पर्यंतची रेंज देते.

महत्वाच्या बातम्या-