बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील ‘ही’ पाच ठिकाणं अत्यंत धोक्याची, काम नसेल तर जाणं टाळा!

मुंबई | सलग दुसऱ्या आठवड्यात बांद्रा पश्चिम कोरोनाचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. कोरोनाच्या रुग्णवाढीचा येथे उद्रेक होत आहे. त्या खालोखाल गोरेगाव, चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व अशी ही 5 महत्वाची, अतिसंसर्गाची आणि पटापट रुग्णवाढीची ही ठिकाणे आहेत. एका आठवड्यात जवळपास 1500 ते 2300 इतके रुग्ण या प्रभागात वाढले आहेत.

मुंबईत रविवारी  7000 रुग्णांची नोंद झाली. जी मुंबईसारख्या गर्दीच्या शहराची चिंता वाढवणारी आहे. मुंबईतील कोरोनाचा उद्रेक होत असलेली पहिल्या पाचातील 4 प्रभाग हे पश्चिम  उपनगरातले आहेत. आणि दर आठवड्याला याच वॉर्डातील कोरोना रुग्णांची दरवाढ वर खाली होते. रुग्ण दुपटीचा कालावधी पण कमी होत आहे. त्याच बरोबर दर आठवड्याला रुग्ण वाढीचा दरही अनेक प्रभागात जवळपास तीन पटीने वाढलेला आहे.

बांद्रा पश्चिम या प्रभागात  मागच्या 7 दिवसात 1763 रुग्ण सापडले आणि इथली रुग्णवाढ सुरूच आहे. इथला रुग्णवाढीचा दर हा 1.78% इतका आहे. 21 मार्चला इथली एकूण कोरोनाबधितांची संख्या 13387 इतकी होती, जी 28 मार्चला वाढून 15,150 इतकी झाली. आतापर्यंत 330 लोकांचा मृत्यू झाला असून सध्या 2222 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, बांद्रा खालोखाल गोरेगावात रुग्णवाढीचा दर 1.69% असून मागच्या 7 दिवसांत 1825 तर चेंबूरमध्ये रुग्णवाढीचा दर 1.68% त्या खालोखाल अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्वमध्ये रुग्णसंख्या मोठया प्रमाणावर प्रमाणावर वाढत आहे. चेंबूर वगळता इतर 4 प्रभाग हे एकट्या पश्चिम उपनगरातले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

संकष्टी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ मंदिर बंद, प्रशासनानं केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनात एकनाथ शिंदेंना डावललं; भाजप नेत्याचं प्रश्नचिन्ह!

शरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे पिता-पूत्रांनी गाठलं ब्रीच कँडी रुग्णालय

कोरोनाविरुद्ध कठोर पावलं उचला नाहीतर… केंद्र सरकारचा राज्यांना मोठा इशारा

व्हिडीओ कॉल उचलताच तरुणी कपडे काढू लागली, त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More