Top News

1 जानेवारीपासून हे पाच नियम बदलणार; प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत!

मुंबई | येत्या नवीन वर्षात पर्सनल फायनान्सशी संबंधित काही बदल होणार आहेत. हे बदल 1 जानेवारीपासून लागू होती.

चारचाकी गाड्यांसाठी FASTags अनिवार्य असेल

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करण्यात आलंय. यानुसार, 1 जानेवारी 2021 पासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग्स’ बंधनकारक असणार आहे. केंद्रीय मोटार मोटार वाहन नियम 1989 प्रमाणे, फास्ट टॅग’ ला 1 डिसेंबर 2017 नंतर खरेदी केलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी बंधनकारक केलंय.

चेकच्या माध्यामातून पैसे देण्याच्या नियमांमध्ये होणार बदल

येत्या 1 तारखेपासून म्हणजेच नववर्षापासून चेकच्या माध्यमातून पैसे देण्याच्या नियम बदलणार आहेत. यामध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त धनादेशासाठी पॉझिटीव्ह पेमेंट सिस्टीम लागू होणार आहे. चेक पेमेंट करण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतर्फे धनादेशाची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि देय रक्कम यांची माहिती तपासणी जाईल. यात चूक आढळल्यास पेमेंट होणार नाहीये.

काँटॅक्ट लेस कार्ड व्यवहार

आरबीआयने काँटॅक्ट लेस कार्ड देण्याची मर्यादा ही 2 हजार रुपयांवरून 5 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही मर्यादा नववर्षापासून लागू होणारे.

जीएसटी रिटर्नच्या नियमांत बदल

छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी 5 कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय करणाऱ्यांना 1 जानेवारीपासून वर्षाच्या काळात केवळ 4 विक्री परतावा भरावा लागणारे. यानुसार व्यापाऱ्यांना मासिक तत्वावर 12 रिटर्न भरावे लागणार आहेत. नवीन नियम लागू झाल्यानंतर करदात्यांना फक्त 8 रिटर्न भरावे लागतील. यांपैकी 4 जीएसटीआर 3 बी आणि 4 जीएसटीआर 1 रिटर्न भरावे लागणार आहेत.

कारच्या किमतीत वाढ

वाहन कंपन्या त्यांच्या बर्‍याच मॉडेल्सच्या किंमती जानेवारीमध्ये वाढणार आहेत. महिंद्रा नंतर आतापर्यंत मारुती, रेनो यांनी किंमत वाढवण्याची घोषणा केलीये.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पुण्यातील एअरहोस्टेस तरुणीसोबत घडली अत्यंत संतापजनक घटना

16 लाख रुपयांचा बकरा चोरणारे अखेर पोलिसांना सापडले!

सासूनं सोसले विधवेचे चटके; सुनेलाही ते बसू नयेत म्हणून करुन दिला पुनर्विवाह!

संजय राऊत बोलले त्यामध्ये तथ्य असणार- जयंत पाटील

ईडीचा राजकारणासाठी वापर असं महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही- अनिल देशमुख

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या