बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील ‘ही’ चार मोठी शहरं पाण्याखाली जाणार; IPCC चा धक्कादायक रिपोर्ट

नवी दिल्ली| हवामान बदलाचे गंभीर संकेत गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळत आहेत. समुद्रात होणाऱ्या हलचालींना वेग आला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या चर्कीवादळांच्या प्रमाणात आणि तिव्रतेत मोठा फरक पडलेला दिसत आहे. तर अंटार्टिका आणि आकर्टिकवरील बर्फ वितळण्याचे प्रमाण देखील गेल्या 20 वर्षात कमालीची वाढ झाली आहे. त्यातच आता आयपीसीसीने सादर केलेल्या एक रिपोर्टनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंट चेंज याचा 6 वा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. ‘क्लायमेंट चेंज 2021 – द फिजिकल सायन्स बेसिस’ असं या अहवालाचं नाव आहे. येत्या काळात पुथ्वीवर होणाऱ्या तापमान वाढीमुळे कोणते दुष्परिणाम जाणवतील यावर भाष्य करणारा हा अहवाल आहे. यात भारताबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे.

या शतकाच्या अखेरीस भारताच्या किनारपट्टी भागातील 12 शहरं पाण्याखाली जाणार असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या 12 शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टनम या मोठ्या शहरांचा देखील समावेश आहे. कांडला, ओखा, भावनगर, मोरमोगाओ, मँगलोर, कोचिन, पारदीप, खिडीपूर आणि तुतीकोरीन या शहरांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, तापमान वाढीमुळे 2100 पर्यंत समुद्राटी पातळी 2 मीटरने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 2150 पर्यंत ही पाणीपातळी 5 मीटर पर्यंत वाढणार आहे, असं या अहवालात सांगितलं आहे. आयपीसीसी मोठ्या प्रमाणात डाटा गोळा करून या तापमान वाढीचा अभ्यास करत आहे. जगातील सर्व देशांवर होणाऱ्या परिणामांबद्दल देखील त्यांनी अहवालात विश्लेषण केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 20 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ

“लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार की अजूनही घरुनच काम करणार?”

“भाजपला मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर…”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More