बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाइम मॅगझिनच्या 100 ‘सर्वात प्रभावशाली लोकांच्या’ यादीत मोदींसह या व्यक्तींचा समावेश

नवी दिल्ली | देशावर कोरोना महामारीचं संकट गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. आपापल्या परीने जो तो या महामारीवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच जगातील विविध क्षेत्रातील प्रभावशाली लोकांची नाव जाहीर होत आहेत. जगातील मान्यवर संस्था त्या त्या क्षेत्रातील प्रभावी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बहुमान देत असतात.

जगातील सर्वात लोकप्रिय आणि मानाचं मानलं जाणाऱ्या टाइम्स मॅगझीनने 2021 च्या सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची नावं जाहीर केली आहेत. या यादीत आपल्या देशातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे सिइओ आदर पुनावाला यांची नावं आहेत. या तीघांच्या कार्याची दखल टाइम्स मॅगझीनने घेऊन जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत यांचा समावेश केला आहे. राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या मोदी आणि ममता यांच्या समावेशाने राजकीय जुगलबंदी रंगणार आहे.

टाइम्स मॅगझीनने 2021 साठी ही यादी प्रसिद्ध केली आहे. सध्या देशातील वातावरण हे कोरोना, मंदिर, रोजगार यावर भडकलेलं असताना आता टाइम्स मॅगझीनचा समावेश सुद्धा राजकीय फटकेबाजीसाठी होणार आहे.

सिरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी आहे. कोरोना काळामध्ये सिरम इन्स्टिट्यूट जगाच्या केंद्रस्थानी आली आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे सिरमचे मध्यवर्ती केंद्र जागतिक चर्चेचा विषय आहे. टाइम्स मॅगझीनने देशातील या तीन नावांचा समावेश केल्याने देशाला महुमान मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या प्रकरणात न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निकाल

‘आता तरी सरकारनं जागं व्हावं’; खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More