मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना विरूद्ध लढण्यासाठी शरिराची प्रतिकार शक्ती वाढवा, असा सल्ला डॉक्टर वारंवार देत आहेत. शरिराची प्रतिकार शक्ती जर मजबूत असेल तर व्हायरल इंन्फेक्शन आणि बुरशीजन्य आजारांपासून वाचण्यासाठी मदत होते. रोगप्रतिकार शक्ती ही पांढऱ्या रक्तपेशी, लिम्फ नॉडस् आणि अँन्टीबॉडीजपासून बनलेली असते.
संध्याकाळी चांगली झोप घेतल्यानंतर प्रत्येकजण टवटवीत होतो. मात्र, ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली नाही ते लोक चांगली झोप घेवून देखील सुस्त राहतात. काही काम केलं नाही तरी सुद्धा शरिर थकून जाते. त्यावर उपाय म्हणून व्यायाम आणि योग करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. व्यायाम आणि योगा केल्यामुळे शरिरातील ऊर्जा पातळी आणि रक्ताभिसरण वाढते.
तसेच शरिरातील थकवा दूर होऊन शरिरामध्ये चैतन्य निर्माण होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एका वर्षातून दोन ते तीन वेळेस सर्दी होणे सामान्य आहे. मात्र, काही लोकांना वारंवार सर्दी होते किंवा दिर्घकाळापर्यंत राहते. सर्दी झाल्याने रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी शरिराला तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. तुम्हाला जर जास्त दिवस सर्दी राहत असेल तर हे शरिरामध्ये कमी रोग प्रतिकार शक्ती असल्याचे लक्षण आहे.
दरम्यान, तणाव देखील कमी कमकुवत प्रतिकार शक्तीचे लक्षण असू शकते. तणावाचा सर्वाधिक परिणाम तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर असू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. जास्त ताण घेतल्याने पांढऱ्या रक्तपेशी आणि लिम्फोसाइटची संख्या कमी होते. हे दोन्ही घटक शरिराला रोगाशी लढण्यास मदत करतात.
थोडक्यात बातम्या-
“2024ला नरेंद्र मोदींविरूद्ध प्रियंका गांधी पंतप्रधानपदाच्या दावेदार”
काँग्रेसला धक्क्यावर धक्के! स्टार प्रचारकानेच केला भाजपमध्ये प्रवेश
“किरीट सोमय्या भाजपच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करतात”
प्रत्येकाला ओमिक्राॅन होणार का???; WHOने दिली महत्त्वाची माहिती
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर, डाॅक्टर म्हणतात…
Comments are closed.