बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मगरी असलेल्या विहिरीत टांगलं…” पुण्यातील गायकवाड बाप-लेकाचा आणखी एक प्रताप

पुणे | राज्यात मागील काही वर्षात खासगी सावकार आणि कर्जदार हे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी सावकार आपले पैसे वापस मिळवण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करत असतात. पुण्यातील पिंपरीमधील डबल मोक्कातील क्रूरकर्मा बाप-लेकांविरूद्ध पिंपरी-चिंचवडमध्ये दोन नवीन गंभीर गुन्हाची नोंद झाली आहे.

एका कर्जदाराला त्यांनी सुस येथे असलेल्या फार्म हाऊसवर मगरी असलेल्या विहीरीत उलटे टांगले होते. जर पैसे दिले नाही तर विहीरीत टाकण्याची धमकी दिली होती, असं फिर्यादीने आपल्या तक्रारीमध्ये सांगितलं आहे. फिर्यादी हा पेशाने गॅरेजचालक आहे. नानासाहेब शंकर गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

बापलेकांना पोलिसांनी बेड्या घातल्यानंतर तक्रारदार पुढे येत आहेत. आतापर्यत व्याजाने पैसे घेतलेले नागरिक हे त्यांच्या दहशतीमुळे शांत होते. पुणे पोलिसांनी मोकान्वये त्यांना अटक करण्यात आली आहे. बापलेक दोघेपण पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. याबरोबरच त्यांचा वकिल मिश्रा आणि नाणेकर यांचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच गायकवाड बापलेकांच्या गाडीचा चालक राजाभाऊ अंकुश हा येरवडा कारागृहात आहे. लवकरच पुणे पोलीस चालकास त्यांच्या ताब्यात घेणार आहेत.

गायकवाड यांच्याविरूद्ध बेकायदेशीर सावकारी, खंडणी, अपहरण आणि गोळीबारचा गुन्ह्यांची नोंद आहे. अंश गॅरेजच्या मालकाने 10 लाख रूपये व्याजाने घेतले होते, त्या बदल्यात 22 लाख रूपये गायकवाड बापलेकाने वसूल केले. पैसे न दिल्याने बापलेकाने फिर्यादीचे अपहरण करत त्यांनी बंगल्यात कोंडून हवेत गोळीबार केला. नंतर फिर्यादीची 5 गुंठे जागा नावे केली होती.

 

थोडक्यात बातम्या – 

वादानंतर पहिल्याच भाषणात राणेंचा उडवून दिली खळबळ, “आपल्याच बंधूच्या पत्नीवर…”

“तुम्हाला सुट्टी नाही, लवकरच हिशोब चुकता करणार”; जो बायडन संतापले!

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतील पोलिसाची बदली, संपत्ती ऐकाल तर डोळेच फिरतील!

पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं, आता आदित्य ठाकरेंकडून मिळालं मोठं बक्षीस!

एकनाथ खडसेंना सर्वात मोठा धक्का, एवढ्या कोटी रुपयांची संपत्ती जप्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More