कार चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, ‘हे’ नियम लवकरच लागू होणार
मुंबई | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चाकचाकी वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. नितीन गडकरी यांनी कार चालकांसाठी जारी केलेल्या या निर्णयामुळे आता कार (Four Wheeler) प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे.
सरकारने सर्व प्रवासी वाहनांमध्ये किमान दोन एअर बॅग (Air Bag) असणे बंधनकार केले होते. त्यानंतर आता 8 सीटर कारसोबत 6 एअरबॅग देणे वाहन उत्पादक कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षेसंदर्भातील हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे.
8 सीटर वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता वाहनांमध्ये आणखी चार एअर बॅग्ज बंधनकारक करण्यात आल्या आहेत. यामुळे जर वाहनांची समोरासमोर किंवा बाजूने टक्कर जरी झाली तरी प्रवाशांच्या जीवास धोका कमी होतो.
दरम्यान, या नवीन नियमामुळे चारचाकी वाहनांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र, जर तुम्ही आधीच कार घेतली असेल आणि जर ती बदलायची असेल तर कारची किंमत 50,000 रूपयांनी वाढण्याची शक्यता आहे. तर भारतात कार प्रवास सुरक्षित करण्याच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“भाजप सत्तेत असतानाच काश्मिरी पंडित बाहेर गेले”
IPL 2022! मिस्ट्री गर्लनं उडवलीय सर्वांची झोप, पाहा कोण आहे ‘ही’ तरुणी
Health ! काॅफी सेवनाचे आहेत ‘हे’ महत्त्वाचे फायदे
मोठी बातमी! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला, पाहा व्हिडीओ
IPL 2022! अक्षरच्या धागा खोल खेळीच्या बळावर दिल्ली विजयी
Comments are closed.