मुंबई | भारतीय रिझर्व बँकेने नोटांसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बाजारातुन काही नोटा कायमच्या हद्दपार होणार आहेत. नोटांची फिटनेस चाचणी घेण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. अनेकदा लोक जुन्या आणि फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करतात. मात्र, आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार आता नोटांची फिटनेस चाचणी घेतली जाणार आहे. त्या जर फिटनेस चाचणीत उतरल्या नाहीत तर बाद होणार आहेत.
रिझर्व बँकेने बँकांना नोटा मोजण्याऐवजी नोटांची फिटनेस तपासण्यासाठी नवीन मशीन वापरण्याच्या सुचना दिल्या आहेत. बँक प्रणालीमध्ये खराब नोटा बराच काळ चालत आलेल्या आहेत. आता यात अमुलाग्र बदल होऊन बँकांची नवीन पद्धत सुरु होणार आहे. नोटांची फिटनेस तपासण्यासाठी आरबीआयने 11 नियम दिले आहेत. त्यानुसार बँकेत आलेल्या नोटा तपासल्या जाणार आहेत.
फिटनेस टेस्टमध्ये कोपरे दुमडलेल्या, गोंद किंवा चिकटपट्टीने चिटकवलेल्या, खोडता न येण्यासारखा मजकूर लिहीलेल्या आणि फाटलेल्या नोटा अयोग्य समजल्या जाणार आहेत. बँकांना प्रत्येक तीन महिन्यांनी नोटांच्या फिटनेस टेस्टबाबत रिझर्व बँकेला अहवाल पाठवावा लागणार आहे. कोणकोणत्या नियमांना किती नोटा पूर्ण करु शकल्या नाहीत, हे अहवालात स्पष्ट करावे लागणार आहे.
कोपरे दुमडलेल्या, अतिशय घाण्यारड्या अवस्थेत असलेल्या, भरपूर धुळ असलेल्या, नरम पडलेल्या नोटा, आठ चौरस मिलीमिटर पेक्षा मोठे छिद्र असलेली नोट तसेत नोटांमधील कोणताही ग्राफिक बदल अयोग्य मानला जाणार आहे. नोटेवर पेणाची शाई, मजकूर, चित्र, खुणा आणि रंग उडालेल्या नोटा आदी बाद ठरणार आहेत. बँकेत अशा नोटा स्विकारुन बँक ग्राहकांना दुसरी नोट देणार आहे.
थोडक्यात बातम्या –
पुतिन यांची मोठी घोषणा, रशिया-युक्रेन युद्धाबाबत महत्त्वाची माहिती समोर
‘मी कोणालाही घाबरत नाही…’, कालीच्या पोस्टर वादानंतर लिना मनिमेकलाईंचं स्पष्टीकरण
राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
शिंदे गटाचा शिवसेना आमदारांना झटका, आदित्य ठाकरेंना मात्र मोठा दिलासा
पैसे द्या अन् पदवी घ्या! पदव्या विकण्याचा गोरखधंदा जोमात
Comments are closed.