बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ लोकांना कोरोना लस घरीच मिळणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा नीती आयोगाचे सदस्य डाॅ. वीके पाॅल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

ज्या लोकांना लसीकरणासाठी केंद्रावर जाता येत नाही, अशा लोकांना आता घरीच लस मिळणार आहे. ‘डोअर टू डोअर’ लसीकरण दिव्यांग आजारी तसेच आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी सुरु केलं आहे.

लसीकरण केंद्रापर्यंत प्रत्येकाला पोहोचणं शक्य नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्र जवळच उपल्ब्ध करुन दिलं आहे. मात्र तरी देखील अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी आता डोअर टू डोअर लसीकरण सुरु केलं आहे.

दरम्यान, केंद्राच्या या नवीन निर्णयामुळे आता सर्वांना लसीकरण घेण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे लसीकरणचा आकडा देखील वाढला आहे. आतापर्यंत 83 कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. यातील 23 टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहे.

थोडक्यात बातम्या-

“सेना-राष्ट्रवादीच्या संगतीमुळे काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची भाषा बिघडली”

“शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचं फोडायचं?”

“भारताने जे केलं ते कोणीही करू शकलं नाही”; सर्वोच्च न्यायालयाने केलं केंद्राचं कौतुक

काय सांगता! अवघ्या 33 हजारांमध्ये मिळतेय बजाज डिस्कव्हर बाईक

आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर भरघोस चुका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More