मोठी बातमी! ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही कर

मुंबई | आयकर (Tax) हा मध्यमवर्गापासून उच्च वर्गापर्यंत सर्वांसाठी आवश्यक कर आहे. ज्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यावेळी मोठा बदल करणार आहेत.

तुम्हीही टॅक्स भरत असाल किंवा टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

सध्या 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. मात्र या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन ही मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहेत. म्हणजेच या बदलानंतर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही.

याआधी 2014 मध्ये शेवटच्या वेळी आयकर मर्यादेत बदल करण्यात आला होता. त्यावेळी ही मर्यादा 2 लाख होती, ती वाढवून 2.5 लाख करण्यात आली.

दरम्यान, मोदी सरकार 2023 मध्ये आपल्या दुसऱ्या टर्मचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. पुढील वर्षी अर्थसंकल्पाच्या सुमारे 13 महिन्यांनंतर सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने यावेळी सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत असल्याचं मानलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-