बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळा; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी आता भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र अनेकांना लसीकरणांनतर कोणती गोष्टी करु नये? याबाबत संभ्रम आहे. विशेषतः जे मद्दपान करतात त्यांना आपण लस घेतल्यानंतर मद्दपान करावं की नाही असा प्रश्न पडला आहे. याबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.

लसीकरणानंतर अनेकांना एक ते दोन दिवस ताप येतो. तसेच अशक्तपणा देखील येतो. मद्यपानानंतर माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याचप्रमाणे ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांची समस्या आहे, अशांना मद्यपानंतर लगेच काही लक्षणे जाणवतात. अशा नागरिकांनी लसीकरणानंतर मद्यपान करणं चुकीचं ठरू शकतं, असं वैद्यकीय अधिकारी भूपेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे.

लसीकरणाच्या आधी आणि लसीकरणानंतर शक्यतो मद्यपान करणं टाळायला हवं. मद्यपानाचे शरीरावर अनेक विपरीत परिणाम दिसून येतात. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. सरकारच्या वतीने किंवा अन्य कोणीही याबाबत अधिकृत दुजोरा दिला नसला तरी लसीकरणाच्या दोन दिवस आधी आणि लसीकरणानंतर दोन दिवस मद्यपान टाळल्यास लसीकरणाचा शरीरावर चांगला प्रभाव पडू शकतो, असं भूपेंद्र पाटील यांनी म्हणाले.

दरम्यान, लसीकरणानंतर माणसाचा आहार संतुलित असणं गरजेचं आहे. मद्यपानाच्या वेळी थंड आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन होतं. हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज!

“कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही”

मित्रांनी आपल्याच मित्रावर केला हल्ला; बेदम मारहाणीमुळे 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे- हसन मुश्रीफ

“आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझं मौन हे कुणी माझी कमजोरी समजू नये”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More