Top News देश

कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांधी

नवी दिल्ली |  कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या 71 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरीदेखील सरकारने त्यावर कोणताच तोडगा काढलेला नाही. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे तीन कृषी कायदे केवळ शेतकरी आणि मजूरांसाठीच नाही, तर जनता आणि देशासाठीही घातक, असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

शेतकरी संघटनांनी कृषी कायद्याविरोधात चक्का जाम आंदोलन पुकारलं आहे. त्यांच्या या आंदोलनाला राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन समर्थन असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान , शेतकरी संघटनांचा कृृषी कायद्याविरोधात  6 फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या आंदोलनात दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरी सहभागी होणार नसल्यानं या राज्यात आंदोलन होणार नसल्याचं भारतीय किसान युनीयनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सूनेचे सासऱ्यासोबत शारीरिक संबंध दाखवल्यामुळे या वेबसिरीज विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

“अनुपम खेर तुझं आता काही खरं नाही; पिसारा फुलवून पार्श्वभाग दाखवणाऱ्या मोरासारखी अवस्था झालीय”

“मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?”

‘हा’ चित्रपट ठरला सर्वांचा बाप! रिलीझ होण्याआधी कमवले 348 कोटी

मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा- रतन टाटा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या