बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्या बोलता क्या चीज है पैसा! ; आयपीएलचे हे तीन संघ करतात ‘इतक्या’ कोटींची कमाई

मुंबई | 2008 साली भारतात इंडियन प्रिमियर लीग या स्पर्धेला सुरूवात झाली. आयपीएल ही जगातली सर्वात प्रसिद्ध लीग समजली जाते. आयपीएलला भारतीयांनी भरपूर प्रेम दिलं आहे. त्यामुळेच मागील 13 वर्षात आयपीएलने खूप मोठी प्रगती केली आहे. आयपीएलमुळे आज अनेक खेळाडू करोडपती झाले आहेत. त्याचबरोबर आयपीएलमधून बीसीसीआय आणि संघाच्या मालकांनी देखील भरपूर पैसे छापला आहे.

दरवर्षी साधारण आयपीएलचे 60 सामने होतात. तर यात प्रत्येक संघ किमान 14 सामने खेळत असतो. आयपीएलच्या एका सामन्यात एक दोन नव्हे तर जवळपास 81 कोटी रुपये इतका महसूल मिळतो. तर संपूर्ण आयपीएल हंगामात जवळपास 4900 कोटी इतका महसूल मिळतो. 2019-20 च्या रिपोर्टनुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

याच रिपोर्टनुसार, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा संघ सर्वाधिक महसूल कमावणारा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्सची हंगामी कमाई 761 कोटी रुपये इतकी आहे. तर त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सचा नंबर लागतो. चेन्नईच्या मॅचमधून बीसीसीआयला 611 कोटींचा महसूल मिळतो. तर याच यादीत 543 कोटीच्या कमाईसह कोलकाता नाईट रायडरचा तिसरा क्रमांक लागतो.

दरम्यान, फुटबॉल लीग एनएफएलमधून सर्वात जास्त कमाई होते. एनएफएलची हंगामी कमाई ही 98,300 कोटी रूपये आहे. तर प्रति सामना एनएफएलची कमाई 364 कोटी रूपये आहे. आयपीएलमधून होणाऱ्या कोट्यवधीच्या कामाईमुळेच बीसीसीआय नेहमी आयपीएल सामने खेळवण्याच्या तयारीत असते. मागील वर्षी कोरोना काळातही बीसीसीआयने आयपीएल सामने दुबईला भरवले होते.

थोडक्यात बातम्या-

मास्क नाकावरुन घसरलं म्हणून पोलिसांनी भररस्त्यात तुडवलं, पाहा धक्कादायक व्हिडीओ

कोविशिल्डचा दुसरा डोस घेताना ‘इतक्या’ दिवसांचं अंतर ठेवा, स्वत: पुनावालांनी सांगितलं कारण…

नवरी मंडपात पोहोचली अन् सासूला समजलं ही तर आपलीच बेपत्ता झालेली मुलगी!

हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते पण…- दिया मिर्झा

‘या’ शहरात दिसलं काळजात धडकी भरवणारं चित्र; एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More