‘या’ झाडाचं फळ खाल्ल्याने तृतीयपंथीयालाही अपत्यप्राप्ती होते!

औरंगाबाद | या दर्ग्यातील झाडाचे फळं खाल्ल्याने निपुत्रीकांना अपत्यप्राप्ती होते, तसंच तृतीयपंथीयालाही अपत्यप्राप्ती होते, असा धक्कादायक दावा खुलताबाद येथील मौलानांनी केला आहे. मोहम्मद समीर मुजावर असं या मौलानांचं नाव आहे.

खुलताबाद येथे हजरत शेख शा जलालउद्दीन गंजे रवा सफरवर्दी यांचा दर्गा आहे. या दर्गा परिसरात आसेचे झाड आहे. तसेच ‘परीयो का तालाब’ देखील आहे. दर्गा परिसरातील आसेच्या झाडाबाबतच्या चमात्कारांचा दावा मोहम्मद समीर मुजावर या मौलानांनी केला आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या औरंगाबादमधील कार्यकर्त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार समोर आला असून संबंधित मौलानांविरोधात जादू टोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी; पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

-धनंजय मुडेंच्या मंडळात सपना चौधरीचे ठुमके! पाहा व्हिडिओ

-लालबागचा राजा कोट्यधीश; 5 दिवसात मिळालं एवढ्या कोटींचं दान

-धक्कादायक! अभिनेत्री प्रियांका चोप्राला झालाय हा आजार; स्वतः केला खुलासा

-पेट्रोल दरवाढीवर प्रश्न विचारला म्हणून भाजप नेत्याची रिक्षाचालकाला मारहाण

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या