बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona: हिवाळी अधिवेशनात हजेरी लावलेल्या ‘या’ दोन आमदारांना कोरोनाची लागण

यवतमाळ | भारतात पुन्हा एकदा कोरोना (Corona) विषाणूने डोकं वर काढलं आहे. पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना (Corona Patients Increased) दिसत आहे. सामान्य नागरिकांसह अनेक मंत्री, कलाकार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता आणखी दोन आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याचं उघडकीस आलं आहे.

आमदार निलय नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: तशी माहिती दिली आहे. ते सध्या नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे.

पुसद मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोन्हीही आमदारांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. इंद्रनील नाईक हे सध्या मुंबईच्या लीलावली रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, सध्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुडें यांना ओमिक्रॉन या नवीन व्हेरीयंटची लागण झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

“वेळ आली तर…”; राजेश टोपेंचा महाराष्ट्राला मोठा इशारा

नाईट कर्फ्यूबाबत वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले…

आरोग्य सचिवांचं कोरोनाबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाले…

‘कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतील कारण…’”; तज्ज्ञांचा धक्कादायक खुुलासा

“नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवायचा आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More