नवी दिल्ली | संसदेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलै पासून सुरू होणार आहेे. यापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काही वापरल्या जाऩणाऱ्या शब्दानां निर्बंध घातले आहेत. या शब्दाचा वापर संसदेत करणं असंसदीय मानलं जाणार आहे.
खासदारांवर बंदी घालणारा आदेश जारी करण्यात आला आहे. आता संसदेत भाषण करताना हे मूळ शब्द वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे शब्द वापरल्यास तुम्हाला संसदेतून निलंबित केलं जाऊ शकतं, अशी माहिती समोर आली आहे. असंसदीय शब्द आणि अभिव्यक्ती सूचीबद्ध करणारी पुस्तिका 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आली आहे,
यामध्ये प्रामुख्याने ‘जुमलाजीवी’, ‘बालबुद्धी’, ‘कोविड स्प्रेडर’ आणि ‘स्नूपगेट’ सारख्या शब्दांचा वापर आणि अगदी सामान्यतः वापरले जाणारे शब्द जसे की ‘लज्जित’, ‘शिल्पग्रस्त’, ‘विश्वासघाती’, ‘भ्रष्ट’, ‘नाटक’, ‘ढोंगी’ इ. शब्दांना निर्बंध घातले गेले आहेत. ‘दोहरा चरित्र’, ‘निकम्मा’, ‘नौटंकी’, ‘धिंडोरा पीटना’ आणि ‘बेहरी सरकार’ असे शब्द असंसदीय अभिव्यक्ती म्हणून सूचीबद्ध केले गेले आहेत.
लोकसभा सचिवालयाच्या नवीन पुस्तिकेनुसार ‘अक्षम’ हा शब्द यापुढे लोकसभा आणि राज्यसभेत असंसदीय मानले जाईल. विनाश पुरुष’, ‘खलिस्तानी’ आणि ‘खून से खेती’ देखील वादविवादाच्या वेळी किंवा अन्यथा दोन्ही सभागृहात वापरल्यास त्या सदस्यांना संसदेतून काढून टाकलं जाईल. मात्र या यादीबाबत विरोधी पक्षाच्या खासदारांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही तर हुकुमशाही आहे, अशी टीका शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या
मोठी बातमी! शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय; वाचा एका क्लिकवर
शिंदे-ठाकरे एकत्र येणार?, बंडखोर आमदाराचं सूचक वक्तव्य
‘फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांचा घणाघात
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ‘राज’पुत्राचा समावेश?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
‘मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा?’, शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.