ते तसे नाहीत… अटक केलेल्यांपैकी मी काहींना ओळखतो- शरद पवार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटातील अटक झालेल्यांपैकी काही जणांना मी ओळखतो, त्यांची अतिरेकी किंवा माओवादी पार्श्वभूमी नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींचा संबंध काही संस्थाशी आहे, म्हणूनच ते लक्ष वळवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी काही विचारवंतांना अटक केल्याची भावना महाराष्ट्रातल्या वैचारिक गटांमध्ये असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, पुणे पोलिसांनी कथित माओवाद्यांकडून जी कागदपत्रे जप्त केली आहेत, त्यामध्ये गंभीर असे काही नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवस्मारकाबाबत 4 आठवड्यांत स्पष्टीकरण द्या; उच्च न्यायालयाचे आदेश

-विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका- नरेंद्र मोदी

-अपशब्द वापरल्यामुळे मराठा समाज आमदार विजय औटींविरोधात आक्रमक!

-विराटने क्रिकेटमधील ‘हा’ प्रकार खेळण्यास दिला नकार

-राहुल गांधी प्राथमिक शाळेतल्या मुलासारखं बोलतात- अरूण जेटली

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या