‘माझ्या विषयावरून जनतेला भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय’, उर्फीचं चित्रा वाघ यांना चोख प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या उर्फी जावेद(Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांचा वाद चांगलाच चर्चत आहे. चित्रा वाघ यांनी शुक्रवारी ट्विट करत उर्फीला तिच्या कपड्यावरून कठोर शब्दात सुनावलं होतं. आता उर्फीनंही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटवर उर्फी म्हणाली आहे की, सध्याच्या राजकारणी लोकांना पाहून वाईट वाटत आहे. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जात आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष दिला जात आहे. प्रत्येक वेळेस पीडितीचे कपडेच जबाबदार असतात काय, असा प्रशन्ही तिनं यावेळी उपस्थित केला आहे.

तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेतेतील अडचण ठरत आहेत. जनतेला फक्त माझ्या मुद्द्यावरून भरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय. खरच प्रत्यक्षात ज्या महिलांना मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही का मदत करत नाही. महिलांचे शिक्षण, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणे यांना का तुम्ही मदत करत नाही.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी उर्फीबद्दल ट्विट करत लिहिलं होतं की, सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या बाईला रोखायला मुंबई पोलिस आहेत की नाही, असं म्हणत त्यांनी उर्फीला बेड्या ठोकायला हव्यात असं मतही व्यक्त केलं होतं.

सध्या सोशल मीडियावर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेल्या वादावरून जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-