‘फुटीर गट चंद्रावर देखील कार्यालय स्थापन करतील एवढे ते…’, संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई | प्रथम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले आणि त्यांच्या गटाच्या आमदारांना घेऊन सुरत, गुवाहाटी आणि गोवा दौरा केला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत संगनमताने सरकार स्थापन केले. आणि त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. या सत्तानाट्यात शिवसेनेतून अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठींबा दिला. त्यानंतर त्यांनी एक एक करत शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह आणि संसद भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरील शिवसेनेच्या कार्यालयावर दावा ठोकला.
यावर बोलताना आता शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. संसदेच्या तिसऱ्या मजल्यावरील शिवसेनेच्या कार्यालयावर बंडखोर गटाने दावा सांगितल्यावर राऊत म्हणाले, फुटीर गट चंद्रावर देखील कार्यालय स्थापन करतील एवढे ते हवेत आहेत. त्यांना शिवसेना भवन, सामना वर्तमानपत्र आणि मातोश्रीवर ताबा मिळवायचा आहे, एक दिवस ते जो बायडनचे घर देखील ताब्यात घेतील. कारण त्यांचा एवढा मोठा पक्ष झाला आहे.
बाळासाहेबांचा मूळ पक्ष हा आमचाच आहे. किंबहूना बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणले आहे. उद्धव ठाकरेंना आम्हीच पक्षप्रमुख केले आहे, असे सांगायलाही ते कमी करणार नाहीत. महाराष्ट्रात सध्या जे चित्र दिसत आहे, त्यात काहीही घडू शकते, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) बारा आमदारांच्या प्रलंबित याचिकेवर आज निकाल लागणार आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, आम्हाला न्यायाची प्रतिक्षा आणि अपेक्षा आहे. आम्हाला न्याय मिळेल अशी आमची आशा आहे, कारण लोकशाहीची एवढ्या उघडपणे कोणीही हत्या करु शकत नाही.
थोडक्यात बातम्या –
तिसऱ्यांदा आई बनणार करिना कपूर?, पोस्ट करत म्हणाली…
“दिल्लीच्या दरबारात शिंदे बाद’शहां’च्या भेटीविना 12 तास तात्कळत बसले”
आमदारांच्या अपात्रतेवर आज निकाल; शिंदे सरकारचं भविष्य ठरणार
‘पूर्वीचे सुलतान मंदिरं पाडायचे,आताचे सुलतान शिवसेना पाडतात’; खासदार फोडल्यानंतर सेना आक्रमक
मोठी बातमी! संजय राऊतांना पुन्हा एकदा ईडीचा झटका
Comments are closed.