बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! …म्हणत ‘ते’ मुलींच्या काही प्रायव्हेट पार्टला लावायचे हात, मुंबई सायबर सेलची मोठी कारवाई!

मुंबई | आपल्याला काही नवीन माहिती, एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपण लगेच युट्यूबवर पाहतो. युट्यूबवर स्वतंत्र चॅनेल असतात त्यामध्ये ते युट्यूबर प्रेक्षकांना माहिती देणं, त्यांचं मनोरंजन करतात आणि या मोबदल्यात त्यांना युट्यूब पैसे देतं. मात्र काही चॅनेल अश्लील आणि असभ्य वर्तवणूक करत काही गोष्टी शूट करतात आणि ते व्हिडीओ अपलोड करतात मात्र हे शूट करताना त्यांची परवानगी घेतात.

एकंदरितं काय तर सध्या प्रँक व्हिडीओ, हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आणि व्हायरल होताना आपण पाहतो. मात्र  मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमार्फत अशाप्रकारे प्रँक व्हिडीओ करणाऱ्या तीन तरूणांना अटक केली आहे. संबंधित तरूण हे तरूणींना समुद्रकिनारी बोलवायचे आणि मुलाकडून अश्लील भाषेचा वापर केला जायचा आणि तसेच मुलींच्या काही प्रायव्हेट पार्टला टच केला जात होता.

आरोपी व्हिडीओच्यावेळी तरूणींना प्रँक व्हिडीओ असल्याचं भासवायचे मात्र त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून व्हिडीओ शूट करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व घटनेनंतर काही तरूणींनी हिम्मत करून पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संंबंधित आरोपी तरूणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत मुंबई पोलिसांनी तरूणींंना आवाहन केलं आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस हे महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत. अनेक तरुण आणि तरुणी पैसा मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या व्हिडीओमध्ये सहभागी होतात. मात्र त्यांनी यात सहभागी होऊ नये. तसेच हा प्रकार कोणासोबत घडला असेल तर सायबर सेल किंवा मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करावी त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले….

ठाकरे सरकारमधील धनंजय मुंडे, राठोड यांच्यानंतर आता संजय राऊतांवर आरोप

अबब! चोरी करण्यासाठी चोराची आयडियाची कल्पना, चोरली तब्बल 400 किलो चांदी

मुलांची आता खैर नाही! पालकांना आता कळणार आपली मुले मोबाईलवर नेमकं काय पाहतात?

‘आपण भाजपमध्ये गेला नसता तर…;’अमोल मिटकरींचा चित्रा वाघ यांना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More