बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता’; चंद्रकांत पाटलांकडून दरेकरांची पाठराखण

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ‘रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष’, अशी टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता चांगलंच राजकारण रंगताना दिसत आहे. त्यामुळे प्रविण दरेकरांना टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रविण दरेकरांच्या वक्तव्याचा अर्थ अश्लिल नव्हता तर बोलीभाषेत ते बोलून गेले, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच प्रविण दरेकरांच्या वाक्याचा गाजावाजा करण्याची गरज नाही. आपण दररोजच्या बोलण्यात असे वाक्यप्रचार वापरतो. त्यामुळे उगीच पराचा कावळा करू नये, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरेकारांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी पक्ष चांगलाचं आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हे महिलांचा अपमान करणारं वक्तव्य आहे, असं म्हटलं होतं. प्रविण दरेकरांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. महिलांचा अपमान करणाऱ्यांचा गाल रंगवू शकतो, असा इशारा रूपाली चाकणकरांनी दिला होता.

दरम्यान ,शिरूरच्या सभेत बोलतांना प्रविण दरेकरांनी राष्ट्रवादी हा श्रीमंतांचा, कारखानदारांचा, सुभेदारांचा पक्ष आहे, अशी टीका केली होती. तसेच राष्ट्रवादी गोरगरीबांना जवळ करत नाही, असं देखील त्यांनी म्हटलं होतं. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यावरून प्रविण दरेकरांनी हे वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं’; अण्णा हजारेंचा इशारा

मालेगावचे एमआयएमचे आमदार म्हणतात; “माझ्या जीवाला धोका आहे”

जगाने जरी स्वातंत्र्य दिलं तरीही महिलांना बुरखा घालून….; तालिबान्यांच्या त्या निर्णयावरून यु-टर्न

“इच्छुकांनो हे लक्षात ठेवा”; मनसेच्या वसंत मोरेंनी सांगितली मोठी गंमत

पक्षाकडून बंदी मात्र ‘राष्ट्रवादी युवक’कडून गर्दीच्या कार्यक्रमांचा धडाका सुरु

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More