बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीच्या आहेत हे त्यांनी दाखवून दिलंय”

मुंबई | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चाकणकर यांच्या निवड झाल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना शुर्पणखेची उपमा दिली आहे. त्यातच आता शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार घेत रूपाली चाकणकर यांची बाजू घेतली आहे.

एका महिलेची झालेली प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीच्या आहेत, हे त्यांनी दाखवून दिले आहे. खरंतर एक सहकारी म्हणून त्यांनी रूपाली चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या, असा घणाघात मनिषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला आहे.

चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकर यांना शुर्पनखेची उपमा दिली आहे. त्यांनी मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवून आणलं आहे. तसेच चित्रा वाघ यांना एखादं मानाचं पद मिळालं असतं तर, त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या असत्या, असं कायंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांच्या जुन्या वादग्रस्त वक्तव्याचा आधार घेत चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका करत म्हणाल्या की, राम नावाचे आमदार मुली पळवण्याची भाषा करतात. त्यावर चित्रा वाघ काहीच बोलणार नाहीत, असं कायंदे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘आपण फक्त टगे पोसतोय, हे त्यांना समजलं पाहिजे’; प्रीतम मुंडेंचा घणाघात

‘…तर शिवसेेनेचे आमदार भाजपसोबत गेले असते’; शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

आमदारांची दिवाळी गोड! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दिवाळीनिमित्त BSNLची खास ऑफर! ‘या’ महिन्यात मिळेल फुकट डेटा-काॅलिंग

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More