बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?”

मुंबई | त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनेचे महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात पडसाद उमटले आहेत. अमरावती, नांदेड, मालेगाव या भागात काही प्रमाणात ताणाव निर्माण झाला होता. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती हिंसाचारावरून भाजपवर जहरी टीका केली आहे.

गुजरातमध्ये गोध्रा दंगलीसारखे प्रयोग करुन देशभर त्याचे लोण पसरवण्याचे काम भाजपाने केलं. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे. भाजपकडून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का देण्यात येत असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आग लावण्याचा धंदा काही नेत्यांनी सुरु केला आहे. महाराष्ट्राची सुज्ञ आणि समंजस जनता त्यांच्या कुटील कारस्थानांना बळी पडणार नाही. भाजप नेत्यांनी हा आततायीपणा सोडून महाराष्ट्रात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा सल्लाही नाना पटोले यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

दरम्यान, अमरावती येथील घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासनानं अनेक नेत्यांवर कारवाई केली आहे. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलीच राजकीय लढाई रंगली आहे.

थोडक्यात बातम्या –

“नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते, त्यामुळेच…”

समीर वानखेडेंना कोर्टाचा मोठा झटका, दिला ‘हा’ मोठा निर्णय

अरे काय हे!… उद्घाटन होताच अजित पवारांनी डोक्याला हात लावला

गुटखा तस्करीत सापडला शिवसेना जिल्हाप्रमुख, शिवसेनेनं उचललं मोठं पाऊल

शरद पवार-अनिल परब बैठकीत नेमकं काय झालं; आली ‘ही’ माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More