मुंबई | मुंबई (Mumbai) लोकल आणि तिथं होणारी हाणामारी हे काही नवीन नाही. मुंबईतील लोकलच्या प्रचंड गर्दीमुळं वारंवार भांडण होत असतात. त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. नुकताच असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन बायका एकमेकींशी जबरदस्त भांडत आहेत.
लोकलमध्ये महिलांचा डबा (Women’s compartment) म्हणजे संकटाचा सामनाच. अगदी केस उपटणे, पर्सनी मारणे, लाथा-बुक्या या सगळ्याचा पुरेपुर वापर बायका भांडताना करतात. अगदी क्षुल्लक कारणांवरुन महिलांची भांडणं होतात. यावेळी अनेकदा प्रमाणाच्या बाहेर वाद होतात. काहीवेळा पोलीसांना मध्यस्थी करावी लागते.
असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडिओ डोंबिवलीचा (Dombivli) आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकावरील पूलवर चढत असताना एका प्रवाशाच्या दुसऱ्या प्रवाशाला पाय लागला. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार मूळ भांडण दोन महिलांचे होतं. व्हिडीओत एकीन दुसरीवर आपल्या नवऱ्यासह पळून गेल्याचा आरोप केल्याचं दिसत आहे.
अनेकजण हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दुसरी महिला मात्र मी हिला सोडणार नाही. ही नाटक करत आहे असं म्हणत आहे. या भांडणावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, हा वाद सुरु असताना दुसरीकडं एका सागर भिसे नावाच्या तरुणाला देखील मारहाण करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला-जावायाला जीवे मारण्याची धमकी; आव्हाडांची भावूक पोस्ट
- “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरपंच झालाय”
- EX गर्लफ्रेंड वीणाबाबत शिव ठाकरेचा खुलासा म्हणाला…
- “आजारी बापटांना प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय”
- स्टॅनचं करावं तेवढं कौतुक कमीच; बक्षिसाच्या पैशातून करणार ‘हे’ महत्त्वाचं काम