बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्यांनी आमचे हात बांधून…’; अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप

काबुल | अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवायला सुरुवात केली. यानंतर तालिबानने अखेर काबूलमध्ये प्रवेश केला. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानवर जगाचं लक्ष आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर आता तालिबानने कब्जा केला आहे. राष्ट्राध्यक्ष अशरफ गानी यांनी देश सोडला आहे. प्रचंड अराजकतेतून जात असलेल्या अफगाणिस्तानवर आता सत्तेचं हस्तांतरण करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. यानंतर आता अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री बिस्मिल्ला मोहम्मदी यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्राध्यक्षांवर टीका केली आहे.

जनरल बिस्मिल्ला मोहम्मदी यांनी ट्विटरवरुन थेट नाव न घेता राष्ट्राध्यक्ष अशरफ गानी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी आमचे हात पाठीमागे बांधून ठेवले आणि मातृभूमी विकली. त्या श्रीमंत व्यक्तीचा आणि त्याच्या गटाचा धिक्कार असो, असं ट्विट मोहम्मदी यांनी केलं आहे.

काबुलच्या नागरिकांची सुरक्षा आमची जबाबदारी आहे. आम्ही त्यांचं संरक्षण करण्याचा सर्वस्वी प्रयत्न करत राहु. आपल्या सुरक्षेसाठी निश्चितच पावलं उचलत आहोत, असंही ते म्हणाले आहेत. असं ते म्हणत असतानाच राष्ट्राध्यक्ष देश सोडून गेल्याने संरक्षण मंत्री बिस्मिल्ला यांच्यावर प्रचंड दबाव आल्याचं जाणवत आहे.

थोडक्यात बातम्या

चक्क खासदारच विसरले राष्ट्रगीत; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांची धडपड, विमानतळाचे फोटो पाहून हैराण व्हाल

15 ॲागस्टची सुट्टी ठरली दुर्देवी, मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव

‘…म्हणून मला देश सोडावा लागला’; अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं कारण

आज राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More