Top News देश

त्यांनी मुख्य हायवेने न जाता शाॅर्टकट घेतला आणि तिथंच घात झाला!

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे खासदार श्रीपाद नाई यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि बॉडीगार्डचा मृत्यु झाला आहे. त्यांची गाडीचा दुसऱ्या कोणत्याही वाहनाल धडकून नाही तर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

उडुपीच्या कृष्ण मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेथून ते यल्लापूरच्या गंटे गणपती मंदिरातही पूजा करण्यासाठी गेले. त्यानंतर ते गोकर्णला चालले होते. मात्र त्यांनी मुख्य हायवेने न जाता शाॅर्टकट घेतला आणि तिथंच घात झाला.

मुख्य रस्त्याने लागणारा वेळ वाचविण्यासाठी उपरस्ता निवडला. हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला होता. यामुळेच एखादा खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडा-झुडपांवर जाऊन आदळली.

दरम्यान, नाईक यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले जात असून त्यांना लगेचच गोव्याला हलवण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

भंडारा आग प्रकरण; त्यानं जीवाची बाजी लावली नसती तर आणखी मोठा अनर्थ…

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

…अन् इंदोरीकर महाराज ढसाढसा रडले; पाहा व्हिडीओ

मराठी नंबर प्लेटवर कारवाई ही मातृभाषेची गळचेपी- राजू पाटील

अकरावी, आयटीआय आणि इतर प्रवेश प्रक्रियांचा मार्ग आता झाला मोकळा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या