बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते; त्यांच्याच हातात फुटला”

मुंबई | विधिमंडळाचा काल अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. काल सभागृहामध्ये विरोधकांनी ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला.पार अध्यक्षांच्या दालनात गोंधळ धक्काबुक्की सुरू झाली होती. यावर पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून विरोधी पक्षनेते सत्ताधारींवर आरोप करत आहेत.

अशातच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांवर भाष्य केलं आहे. 12 आमदारांचं वर्तन तुम्ही बघितलं असेल, ते आमदार कशा प्रकारे वागले. अध्यक्षांसमोरील वेलमध्ये गेले, हे आम्ही पाहतोय. तालिका समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. हे अशा प्रकारचं वर्तन विधानसभेच्या इतिहासात यापूर्वी झालं नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

आज संजय राऊत यांनी मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सभागृहात बोलू दिलं जात नाही, असा आरोप विरोधक सत्ताधाऱ्यांवर करत आहेत. यावर बोलताना मूळात बोलू दिलं जात नाही, असं मला वाटत नाही. सभागृह विचार मांडण्यासाठीच असतं. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण कोकणात एक म्हण आहे, ‘केले तुका, झाले माका’ बॉम्ब त्यांच्या हातातच होता. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण एक चूक किती महागात पडू शकते, असं म्हणत राऊतांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे.

तसेच झालेल्या घटनेवेळी आम्ही त्या सभागृहामध्ये नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. शिस्त मोडली जाईल त्यामुळे सभागृहात दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत आपण पाहिलं. काही वेळेला बिहार, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आम्ही पाहिलं आहे. संपूर्ण दंगलीसारखं चित्र निर्माण झालं होतं. महाराष्ट्रातही अशाप्रकारच्या परंपरा पडू नये, यासाठी विधानसभा अध्यक्षांनी हा कठोर निर्णय घेतला असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे सरकारचा हा बालिशपणा; लढायचं असेल तर मैदानात लढा”

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना रुग्णसंख्येची 111 दिवसांतील निच्चांकी नोंद

युनियनच्या गुंडगिरीला ‘राम कदम’ जबाबदार; राजू सापते आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचा धक्कादायक आरोप

“भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या, आश्चर्य वाटतं की त्यांनी कपडे का नाही फाडून घेतले”

आयपीएलची रंगत आणखी वाढणार; आयपीएलमध्ये 8 नाही तर आता 10 संघ खेळणार

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More