भोपाळ | मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान होशंगाबाद येथील ‘शेतकरी सन्मान निधी योजना’ या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना त्यांनी गुन्हेगार आणि माफियांना इशारा दिलाय.
माफिया लोकांनी नीट ऐकावं, जर त्यांनी काही गडबड केली तर त्यांना 10 फूट खोल खड्यात पुरलं जाईल, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यासपीठावरून जिल्हाधिकाऱ्यांचीही कानउघडणी केली. लोकांकडून एक पैसाही न घेता, त्यांची कामं झाली पाहिजेत, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचवणं म्हणजेच सुशासन होय. आता मी खूप डेंजरस फॉर्म मध्ये आहे, त्यामुळं सर्वांनी आपापली जबाबदारी नीट पार पाडा, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय.
“I am in a dangerous mood nowadays. I will not spare those who are involved in illegal activities. Leave, Madhya Pradesh, otherwise, I will bury you 10 feet deep and no one will know about your whereabouts,” Madhya Pradesh CM SS Chouhan at an event in Hoshangabad Dist. yesterday pic.twitter.com/YvQ7SyHGdy
— ANI (@ANI) December 26, 2020
थोडक्यात बातम्या-
काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी
“वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका”
“बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार लवकरच कोसळणार”
भाजप नेते आशिष शेलारांनी केलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं कौतूक
दीड महिन्यांच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकली सेफ्टी पिन; पिन काढण्यात डॉक्टरांना यश