बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडखोर आमदारांना ‘नाच्या’ म्हणत राऊतांचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या कार्यालय आणि घरांवर तोडफोड होत आहे. आमदारांच्या मागणीमुळे आमदारांच्या घराबाहेर केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आली. याआधीही मुंबई आणि महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्यानां केंद्राने वाय पासून झेड ची सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. मोदी सरकारचा हा निर्णंय केंद्रीय सुरक्षेची ‘वाय झेड’ करणारा आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा शिवसेनेने भाजपला सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे.

बडोद्यात फडणवीस आणि शिंदे यांची रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा ही उपस्थित होते. यानंतर आमदारांना अचानक वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली हे काही लोकशाही स्वातंत्र्याचे रखवाले आहेत?, असा प्रश्न विचारण्यात आला.

खरंतर हे लोक 50 कोटींना विकले गेलेले बिग-बुल म्हणजे बैल आहेत. या वगनाट्याचे सुत्रधार कोण आहे हे आता उघड झालं आहे. सुरक्षा प्रदान करण्यात आलेले हे आमदार मुंबईत उतरल्यानंतर स्वगृही पळून जातील असं वाटल्यानं त्यांना सुरक्षा दिलीये का?, असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला.

महाराष्ट्रातील राजकारणात केद्रांतले लोक तुणतुणे घेऊन उतरले आणि यात राज्यातील आमदार त्यांच्या तालावर नाचत आहेत. यामध्ये भाजपाची त्यांना फूस आहे. हा तमाशाचा फड त्यांनीच रंगवला. फक्त आता मी नाही त्यातली या पद्धतीने ते वागत आहे. पण त्यांचा आता भांडाफोड झाला आहे. भाजप नेहमीच ज्या राज्यात भाजपची सरकार नाही तेथे ते मधी मधी करतात, असाही टोला अग्रलेखातून शिवसेनेने केला आहे.

थोडक्यात बातम्या

“राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, त्यामुळे…”

‘मरण आलं तरी बेहत्तर पण…’; एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट चर्चेत

‘जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर…’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य

“शिवसेना म्हटलं की मोदी, शहा पण घाबरून रस्ता बदलतात”

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न; केंद्राने घेतला हा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More