बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

17 लाखाच्या चोरीचा बनाव; घडलेला प्रकार पाहून पोलिसांनीही टेकले हात!

सांगली | सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात चोरीचा बनाव करत पोलिसात तक्रार दाखल करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे अंबिका स्टील नावाच्या दुकान मालकाने आपल्या दुकानात 17 लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली.

पोलिसात एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी हे या घटनेला गांभीर्याने घेत तपासाची चक्रे फिरवली. पण अखेर तक्रारदार व्यक्तीच चोर असल्याचं तपासाअंती स्पष्ट झाल्याने पोलिसांनीही डोक्याला हात लावले. घडलेल्या घटनेनुसार शेडगेवाडी येथील अंबिका स्टील या दुकानाचे मालक जयंतीलाल रामलाल ओसवाल हे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या छोट्या भावासह व कुटुंबीयांसह शेडगेवाडी येथेच राहत आहेत.

लहान भावाला स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी 17 लाख रुपये देण्याचं कुटुंबीयांनी एकमताने ठरवलं. पण जयंतीलाल यांचा हे पैसे देण्याला विरोध होता. त्यामुळे त्यांनी कुटुंबीयांना थेट विरोध न करता एक कट रचला व त्यामध्ये शेवटी ते स्वतःच अडकले. कुटुंबियांसमोर लहान भावाला 17 लाख रुपये देतो, असं मान्य करत संपूर्ण रक्कम दुकानात ठेवली आणि जयंतीलाल हे कुटुंबीयांना घेऊन हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. कुटुंबीयांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्यांनी आपल्या दुकानात चोरी घडवून आणली. तसेच त्यानंतर आपल्या दुकानात 17 लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्याचा बनाव करत त्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली. 

तपासादरम्यान, पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केलं व त्यानंतर श्‍वानही एकाच जागेवर सारखे फिरत होते. यादरम्यान पोलिसांना तक्रारदार जयंतीलाल याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला असून चोरलेली रक्कम सांगली येथे आपल्या मित्राच्या घरी ठेवली असल्याचं कबूल केलं. तसेच लहान भावाला पैसे द्यायचे नव्हते म्हणून हा बनाव केला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

 

 

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More