बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी पळवळी लाखोंची रक्कम

नाशिक | सिन्नरमधल्या सरदवाडीत एक धक्कादायक पद्धतीने केलेली चोरी उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी चक्क गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून एटीएममधून रक्कम पळवली आहे. चोरट्यांनी एकूण 22 लाख 71 हजार 300 रुपयांची चोरी केल्याची माहिती मिळाली आहे.

सरदवाडी येथे हॉटेल अंजिक्यताराजवळ ॲक्सिस बँकेचं एटीएम आहे. चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री या एटीएममध्ये प्रवेश केला. शटर बंद करून घेत त्यांनी सीसीटीव्हीची वायर तोडून टाकली. त्यानंतर सोबत आणलेल्या गॅस कटरने त्यांनी एटीएमचे तुकडे केले आणि एटीएममधील रक्कम पळवून नेली. त्यानंतर त्यांनी एटीएमचं शटर पुन्हा लावून घेतलं.

चोरट्यांनी एटीएमचं शटर पुन्हा लावून घेतल्याने चोरी लवकर उघडकीस आली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा ग्राहक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. एटीएम फोडून चोरी झाल्याचं पोलिसांना कळवताच पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले.

पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. सीसीटीव्हीवर उमटलेल्या ठशांच्या साहाय्याने चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवाय एटीएम बाहेर सुरक्षारक्षक नेमलेला असतानाही चोरीच्या वेळी सुरक्षारक्षक कुठे होता? याचीही चौकशी पोलिस करणार आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

आता गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये वाचवा पैसे, कसं ते वाचा सविस्तर

“…पण जेव्हा सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही”

पुण्यात डिझेलची शंभरी पार तर दुसरीकडे पुणेकरांचा रिक्षाप्रवासही महागला

अजित पवारांच्या नातेवाईकांकडे आयकर विभागाने जप्त केली तब्बल एवढ्या कोटींची बेहिशेब मालमत्ता

पुढच्या वर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का? धोनीने दिलं हे उत्तर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More