चोरट्यांनी अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरला!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

न्यूयॉर्क | कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) एकमेव पुतळा चोरीला (Stolen) गेला आहे.

उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. सॅन जोस येथील उद्यानामध्ये हा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला होता. सॅन जोस पार्कच्या विभागाने ट्विट करून हा पुतळा चोरी झाल्याची माहिती दिली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. नागरिकांनी चोरट्यांचा शोध घेऊन पुतळा पुन्हा बसवण्याची मागणी केलीये.

या पुतळ्याचं आणि पुणे शहराचं महत्त्वाचं कनेक्शन होतं. पुणे शहराने सॅन जोस शहराला भेट म्हणून दिला होता. सॅन जोस शहर हे पुणे शहरासारखे आहे. दोन्ही शहरांमधील अनेक गोष्टीत साधर्म्य आहे.

दोन्ही शहरांना समुद्ध वारसा आणि इतिहास आहे. दोन्ही शहरे शिक्षणाचे केंद्र आहेत. यामुळे सॅन जोस या शहराची ओळख पुणे सिस्टर सिटी म्हणून झाली.

महत्त्वाच्या बातम्या-