Heart Attack | फास्ट फूड, अनियमित झोप, जेवणातील बदल तसेच बदलती जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यातच आता हार्ट अटॅक (Heart Attack Symptoms) तर साधारणच झाला आहे. हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्यासह हृदयाशी संबंधित विविध आजारांमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. या गंभीर समस्येला तरुणही बळी पडत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
‘या’ गोष्टींमुळेही वाढतो हृदयविकाराचा धोका
ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना अनेक गंभीर आणि विविध आजारांचा धोका असू शकतो. तुम्हाला नियमितपणे पुरेशी झोप न मिळाल्यास, तुम्हाला चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो, तर दीर्घकाळ झोपेच्या समस्यांमुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोकाही वाढू शकतो.
Heart Attack | झोपेची कमतरता देखील धोकादायक
एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की, जे लोक सहसा रात्री 6 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 6 ते 8 तास झोपलेल्या लोकांपेक्षा दुप्पट असतो.
झोपेची समस्या, मायग्रेन, वायू प्रदूषणाच्या संपर्कात येणं आणि जास्त ताण देखील हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळेही तुम्ही गंभीर समस्यांना बळी पडू शकता, त्यामुळे त्यांच्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.
जास्त प्रदूषण असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचं दिसून आलं आहे. जे लोक नियमितपणे प्रदूषित हवेचा श्वास घेतात, त्यांना रक्तवाहिन्या अडकून हृदयविकार होण्याची शक्यता असते.
तीव्र पातळीच्या व्यायामामुळे देखील उच्च रक्तदाबाचा धोका असतो, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आणि जीवघेण्या समस्या उद्भवू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रावणात चिकनपेक्षाही वांगी झाली महाग, इतर भाज्यांचेही दर कडाडले
राज्यातील पावसासंदर्भात काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
सावधान! भारतातील मीठ आणि साखरेच्या अनेक ब्रँड्समध्ये आढळला ‘हा’ घातक पदार्थ
घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या ब्रिटिश गायिकेला करतोय डेट?, फोटो झाले व्हायरल
भाविकांनो पुण्यातील ‘हे’ सर्वात मोठं मंदिर एक महिना बंद राहणार!