Top News महाराष्ट्र मुंबई

“विचार करा कोरोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर?”

मुंबई | कोरोळा काळात आपण लॉकडाऊन केलं वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला. पण विचार करा कोरोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर?, काय झालं असतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळात आपले पोलीस फ्रंटलाइनवर लढले. जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईच्या नागरिकांच्या वतीने पोलिसांचे आभार मानले.

पोलिसांचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्यामुळे कुणी कितीही आदळआपट केली तरीही त्यावर डाग लावू शकणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या लढ्यात पोलीस दलातील अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. याबाद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलं.

थोडक्यात बातम्या-

‘कबीर सिंग’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोनं खळबळ

कोरेगाव भीमा इतिहासाबाबत रामदास आठवलेंची नवी मागणी

कोरोना लशीच्या तात्काळ वापराला मंजुरी मिळणार?; तज्ज्ञांची महत्वाची बैठक सुरू

‘….तेव्हा भाजपला नामकरण करायला कोणी रोखलं होतं?’; काँग्रेसचा भाजपला सवाल

1 जानेवारी हा सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या