बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

मुंबई | उद्यापासून दिवाळीला सुरूवात होत आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशी सर्वजण काही ना काही नवी वस्तू विकत घेत असतात. तर काहीजण या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करत असतात. अशातच आता सोनच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घट झाल्याचं पहायला मिळतंय अशातच आता आज देखील सोन्याच्या दरात किंचीत घट झाल्याचं पहायला मिळालं आहे.

सोमवारी सोन्याच्या दरात 10 रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे भारतीय दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव 46,673 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एचडीएफ सिक्युरिटीच्यानुसार रूपयाची घसरण हे त्याच्या मागचे कारण आहे. मागील व्यापारात दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव 46,683 रूपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीच्या किंमतीत सुद्धा आज 230 रूपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे आज दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 63,014 प्रति किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत तेजी नोंदवली गेली आणि ती 1,783 डॉलर प्रति औंसवर पोहचली. तर चांदीचा दर चांदी 23.75 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली आहे.

दरम्यान, दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 49 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 4 हजार प्रति 10 ग्रॅम वाढू शकतात. त्यामुळे सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतंय.

थोडक्यात बातम्या-

“यंदा दिवाळीला भाऊबीज म्हणून गॅस सिलेंडर मागणार”

“नवाब मलिक म्हणजे बिघडे नवाब, माझ्या अंगावर कोणी आलं तर…”

याला म्हणतात झटपट निकाल! कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने घेतले शिंगावर; पाहा व्हिडीओ

“2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते तर…”

केंद्र सरकारची दिवाळी! जीएसटी संकलनात तब्बल ‘इतक्या’ कोटींची वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More