मुंबई | सोन्या-चांदीच्या दरात(Gold Rate,Silver Rate) सातत्यानं चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मकर संक्राती(Makar Sankranti) जवळ आल्यानं सणासुदीच्या तोंडावर अनेकजण सोने-चांदी खरेदी करण्यास पसंती देत असतात. म्हणूनच जाणून घेऊयात सोन्या-चांदीचे ताजे दर.
शुक्रवारी सोन्याच्या दरात 0.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं 1 तोळ्यासाठी सोन्याचा दर 55,368 रूपयांच्या पातळीवर पोहचला आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरानं उच्चांक गाठल्यानं पुन्हा एकदा नवीन विक्रमी पातळी निर्माण होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.
चांदीचे दर 0. 43 टक्क्यांनी वाढले आहेत. चांदीचे दर प्रति किलोसाठी 68,370 च्या पातळीवर पोहचला आहे. त्यामुळं चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा दर(22 Carat Gold) 1 तोळ्यासाठी 50,900 रूपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर(24 Carat Gold Rate) प्रति तोळा 55,530 रूपये आहे. तर या वर्षाच्या शेवटी सोन्याचा दर 62 हजार प्रति तोळा जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 24 कॅरेट सोनं पूर्ण शुद्ध म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध मानलं जातं. तर 22 कॅरेट सोनं 91 शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यामध्ये इतर धातूंचे मिश्रण असते.
महत्वाच्या बातम्या-