बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीला गाडी घ्यायचा विचार करताय?, Hyundai च्या ‘या’ गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काऊंट!

मुबई | सर्वात मोठा उत्सव म्हणून दिवाळीला ओळखलं जाते. दिवाळीत सर्वजण काही न काही खरेदी करत असतात. दिवाळी ही बंपर ऑफरने बहरलेली असते. अशातच येत्या दिवाळीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या काही डिस्काऊंट देत आहेत.

भारतीय चारचाकी वाहन बाजारातील नामांकीत कंपनी ह्युंदाई ही आपल्या खास गाड्यांसाठी ओळखली जाते. ह्युंदाई कंपनी या दिवाळीत दोन नवीन माॅडेल बाजारात आणत आहे. त्या गाड्यांच्या खरेदीवर कंपनी आकर्षक सुट सुद्धा देत आहे. ह्युंदाई सॅंट्रो, ग्रॅंड आय 10 निऑस, ऑरा सेडान, आय 20 या गाड्यांवर कंपनी  तब्बल 1.5 लाख रूपयांची सुट देत आहे.

ह्युंदाई सॅंट्रो या गाडीच्या पेट्रोल व्हेरियंटवर 10 हजार रूपयांची सुट देण्यात येणार आहे. या गाडीच्या इतर ट्रीम वर ग्राहकांना 25 हजारांची सुट देण्यात येणार आहे. या गाडीवर एक्सचेंज सवलत 10 हजार आणि काॅर्पोरेट सवलत 5 हजार मिळणार आहे. ग्रॅंड आय 10 निऑस या गाडीवर देखील ग्राहकांना 35 हजार रूपयांची सवलत मिळणार आहे. ही सवलत ग्राहकांना रोख प्रमाणात उपलब्ध असेल.

ऑरा सेडान माॅडेलच्या पेट्रोल, डिझेल, या गाड्यांवर 40 हजार पेक्षा अधिक रूपयांची सुट मिळणार आहे. ही सुट ग्राहकांना गाडी खरेदी करताना रोखीने अथवा ऑनलाईन स्वरूपात मिळेल. आय 20 या गाडीवर ग्राहकांना विविध सवलती मिळणार आहेत. यात 35 हजार पेक्षा अधिक सवलती मिळतील. या प्रकारे ह्युंदाई कंपनी ग्राहकांची दिवाळी गोड करणार आहे.

थोडक्यात बातम्या 

कोव्हिशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससंदर्भात महत्वाची बातमी; उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मोठी मागणी

“उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”

लहान भाऊ शेततळ्यात पडला, थोरला वाचवायला गेला, पण नियतीच्या मनात वेगळं होतं!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात दिलासादायक माहिती समोर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More